" कुणीतरी आठवण काढतय ... बाकी काही नाही...."
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावर बावर होण्यासारख बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतय , बाकी काही नाही....
रस्त्यामधे दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकड़े तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव...आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारख बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतय , बाकी काही नाही
Mobile वाजन्या आधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढून SMS वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलो पावली जड़ होत जाईल बहुदा श्वास
घाबरून बिबरुन जाण्या सारख बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतय , बाकी काही नाही
जेवता जेवता जीव घेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोड़े
बोलण्या आधी आवाजाला, सांभालावे थोड़े
सांगुन द्याव काल्जी सारख बिलकुल काही नाही ...
" कुणीतरी आठवण काढतय ... बाकी काही नाही...."
